‘हे’ गाव झाले कोरोनामुक्त; 41 नागरिक परतले घरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. सोनईमध्येदेखील रुग्ण आढळून आले होते. ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. एकाचवेळी 10 जणांना करोना झाल्याने बहुचर्चित झालेली सोनई जुलैच्या अंतिम टप्प्यात कोरोनामुक्त झाली आहे.

संक्रमित झाल्याने उपचार घेत असलेल्या सर्व 41 जणांचे अहवाल आता निगेटीव्ह आल्याने ते घरी परतले असून नागरिक सुखावले आहेत.

मागील 4-5 दिवसांत सोनईत एकाही नवीन रुग्णाची भर पडलेली नाही तसेच प्रशासनाने हॉटस्पॉट शिथिल केल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झालेले आहेत.

तसेच सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक, आशा सेविका घरोघर जाऊन रुग्णांची माहिती घेत असून उपलब्ध औषध, गोळ्या देत आहेत.

सोनईचे कुणीही संशयित रुग्ण नेवासा अगर इतर कोव्हिड सेंटरमध्ये नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कुणाचेही अहवाल प्रतीक्षेत नाहीत.

सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळून काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment