जिल्हा रुग्णालयात आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था. ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्याने गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार शक्य होणार आहेत. 

एकूण ५६ आयसीयू बेड्सची व्यवस्था येथे झाली आहे. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करून वेळेत हे काम पूर्ण केले आणि येथील आयसीयू यंत्रणा वेळेत कार्यान्वित केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment