मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अनिलभैय्या घाबरू नका …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर शहराचे माजी आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना करोनाची लागण झाली आहे नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .

अनिलभैय्या घाबरू नका ,काळजी घ्या, शिवसेना व आम्ही आपल्या पाठीशी आहोत . तुमच्या प्रकृतीबाबत व कोणतीच तडजोड केली जाणार नाही.

असे सांगत त्यांनी अनिल राठोड यांना दिलासा दिला. कोरोनाबाबत संपूर्ण राज्याचा आढावा उद्धव ठाकरें घेत होते. माजी आमदार अनिल राठोड याना कोरोना झाल्याचे वृत्त समजले.

त्यावेळी त्यांना रहावले नाही. त्यांनी लगेच शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर याना भैय्याशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. नार्वेकर यांनी नगर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांच्याशी मोबाईवरून संवाद साधला व माहिती घेतली .

त्यावेळी गिरीश जाधव हे  हॉस्पिटलमधेच अनिल  राठोड यांच्या  सोबतच होते. त्यांनी तात्काळ फोन भय्यां यांना दिला . ५ मिनिटे उद्धव साहेबांचे भैय्यासोबत संभाषण सुरु होते .

त्यांनी भैय्या यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला .संभाषणानंतर त्यांनी गिरीश जाधव यांच्याकडून डॉक्टरांचा मोबाईल नंबर घेतला . त्यानंतर त्यांनी डॉ. एस एस दीपक यांच्याशी बातचीत केली.

अनिल भैय्या यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली . रुग्णालयाकडून भैय्या यांच्याबाबत कोणतीही कसर ठेऊ नका . हवे ते योग्य उपचार करा .

त्यांच्या प्रकृतीबाबत आपण चिंतीत आहोत . कोणताही कठोर निर्णय घेण्याबाबत मागे पुढे पाहू नका असे त्यांनी सांगितले . गेल्या तीन दिवसापासून अनिल भैय्या

याना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment