आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास तीन टप्प्यांत बील भरण्याची सवलत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले. परंतु या कालावधीमध्ये वीजबिल भरता आले नाही. परंतु त्यानंतर जे वीज बिल आले ते एकत्रितरित्या आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती.

याबाबत श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी वीज बिलाबाबत शंका निरसन करून एकत्रितरित्या वीज बिल भरल्यास वीज बिलामध्ये 2 टक्के डिस्काउंट

अथवा ज्या ग्राहकांची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, त्यांना तीन टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा वीज वितरणने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती दिली.

ग्राहकांचे वीज बिलांबाबत शंकानिरसन करण्यासाठी महावितरण श्रीरामपूर उपविभागाच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने वेबिनार (गुगल मीट) व विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील मोहीम ही प्रभारी मुख्य अभियंता श्री. खंदारे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. क्षीरसागर

यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे व त्यांची उपविभागाची संपूर्ण टीम हे मोठ्या प्रमाणात राबवत आहेत.

ज्या ग्राहकांना वीज बिलांबाबत शंका असेल त्यांनी तात्काळ जनमित्र, शाखा अभियंता अथवा उपविभागीय कार्यालय येथील बिलिंगमधील

कर्मचारी यांचे सोबत संपर्क करून तात्काळ वीज बिलांबाबत शंका निरसन करून तत्काळ वीज बिल भरावे, असे आवाहन निलेश नागरे यांनी केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment