जामखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील सहा जण बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले जात आहेत.

काल तालुक्यात नव्याने 19 जण पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या १९ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये जामखेड शहर 14, पिंपरखेड 3, फक्राबाद 1, डोणगाव 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 29 तारखेला शहरातील एक खासगी डॉक्टर व बँक मॅनेजरसह एकूण चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. प्रशासनाने गंभीर दखल घेत संपर्कात आलेल्या तब्बल 108 जणांची कोरोना तपासणी केली होती.

या तपासणीत पुन्हा एकच कुटुंबातील सहा तर इतर दोन असे एकूण आठ जण रात्री करोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर दिवसभरात शहरात एकूण 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,

अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. तसेच काल दि. 30 रोजी सकाळी पुन्हा राळेभात गल्ली येथील महिला तर फक्राबाद येथील 1, पिंपरखेड येथील 3, डोणगाव 1 असे जामखेड तालुक्यात एकूण 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment