अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास या आदेशान्‍वये दिनांक एक ऑगस्ट ते दि.31 ऑगस्ट रोजीचे मध्यरात्रीपर्यंत मनाई राहील.

सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील.   केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. स्‍वतंत्र आदेश आणि एसओपीव्‍दारे अनुमती दिलेल्‍या व्‍यतिरिक्‍त रेल्‍वे प्रवासी वाहतूक व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.

सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.    सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील.  सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे/ प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील.

त्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर/ फिरण्‍यावर सायंकाळी 7 ते सकाळी 5 या कालावधीत निर्बंध राहील.

पासष्ट वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्‍यावश्‍यक   सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्‍यास मनाई राहील.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.  त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोरोना (कोव्‍हीड 19)  वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍याचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍याकारणासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणुन घोषित करण्‍यात आलेले आहे. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्‍य शासनाने महाराष्‍ट्र राज्‍यात निर्बंध शिथिल व टाळेबंदी टप्प्‍याटप्प्‍याने उघडणे ( मिशन बिगिन अगेन) संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्‍या आहेत. त्‍यास्‍तव अहमदनगर जिल्‍ह्यामध्‍ये कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी लॉकडाऊन संदर्भांत सुधारीत मार्गदर्शक सुचनांसह प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्‍वये पुढील बाबींस मनाई करीत आहे.   सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील.  केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.   स्‍वतंत्र आदेश आणि एसओपीव्‍दारे अनुमती दिलेल्‍या व्‍यतिरिक्‍त रेल्‍वे प्रवासी वाहतूक व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.   सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे,प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.    सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील.  सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे/ प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील.

अहमदनगर जिल्‍ह्यातील कन्टेन्मेंट झोन वगळता वरील प्रमाणे प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

या आदेशापूर्वी, जी अत्‍यावश्‍यक दुकाने उघडण्‍यास मुभा देण्‍यात आली होती ती सर्व दुकाने तशीच सुरु राहतील. शारिरीक अंतर ठेवून व स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजना करुन प्रती बस, कमाल मर्यादा 50 टक्के क्षमतेसह जिल्‍ह्यांतर्गत बस सेवा चालविण्‍यास परवानगी असेल.  आंतरजिल्‍हा वाहतुकीचे, नियमितपणे विनियमन (ई-पास व्‍दारे) करण्‍यात येईल. सर्व बिगर-अत्‍यावश्‍यक बाजारपेठा / दुकाने सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत खुली राहतील.  मॉल्‍स आणि बाजारसंकूले ( थिएटर वगळून)  दि. 05 ऑगस्‍ट 2020 पासुन सकाळी 9 ते सायं. 5 या कालावधीत खुले राहतील.  मॉलमधील रेस्‍टॉरंट्स व फूड कोर्टसचे किचन यांना स्‍थानिक प्राधिकरणाचे एसओपी नुसार होम डिलिव्‍हरीची परवानगी असेल.

 शासनाने परवानगी दिल्‍याप्रमाणे मोकळ्या जागा, लॉन, बिगर वातानुकूलित सभागृह यामध्‍ये विवाहासंबंधीत समारंभाना परवानगी देण्‍यात येईल.  निर्बंधासह मैदानी शारीरिक कसरती करण्‍यास परवानगी असेल.   वर्तमानपत्राचे मुद्रण व त्‍यांचे वितरण (घरपोच सेवेसह) परवानगी असेल.   ई-मजकुराचा विकास, उत्‍तर पत्रीकेचे मूल्‍यांकन आणि निकाल जाहीर करणे, यासह बिगर शैक्षणिक कामे यासाठी शैक्षणिक परिसंस्‍थांची (विद्यापिठ/ महाविद्यालय / शाळा) कार्यालये/ कर्मचारी वर्ग, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना मुभा असेल.  शासनाचे परवानगी दिल्‍याप्रमाणे, शर्तींसह केस कर्तनालये, स्‍पा, सलून, ब्‍युटी पार्लर उघडण्‍यास परवानगी असेल.  गोल्‍फ  कोर्स, आउटडोअर फायरिंग रेज, जिम्‍नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्‍लखांब अशा बिगर समूह बाह्य क्रिडा प्रकारांस दि.05 ऑगस्‍ट 2020 पासुन शारीरिक अंतर ठेवून व स्‍वच्‍छतेच्‍या उपाय योजनांसह परवानगी असेल.  जलतरण तलाव चालविण्‍यास परवानगी असणार नाही. 

सर्व सार्वजनिक आणि खाजगी परिवहन व्‍यवस्‍था नियमितपणे पुढील प्रमाणे प्रवासी व्‍यवस्‍थापनाचे पालन करतील. – मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील. 1) दुचाकी  – 1 + 1 हेल्‍मेट आणि मास्‍कसह, 2) तीन चाकी – फक्‍त आवश्‍यक 1 + 2,  3) चार चाकी –  फक्‍त आवश्‍यक 1 + 3   कोणत्‍याही विशेष / सर्वसाधारण आदेशाव्‍दारे मुभा दिलेले व परवानगी दिलेले इतर कोणतेही कार्य.

अहमदनगर जिल्‍हामध्‍ये सार्वजनिक ठिकाणी व कामाचे ठिकाणी कोव्‍हीड-19 चे व्‍यवस्‍थापनाचे दृष्‍टीने पुढील राष्‍ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.  चेहरा झाकणे – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी व प्रवास करताना, चेहरा झाकणे अनिवार्य आहे.  सामाजिक अंतर राखणे – सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्‍यक्‍तींनी कमीत कमी 6 फूट (2 गज की दूरी ) इतके अंतर राखले पाहिजे. दुकानदार, ग्राहकांमध्‍ये शारीरिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना मुभा देणार नाहीत.  एकत्र जमणे – मोठी सार्वजनिक संमेलने/ भव्‍य सभा यांस नियमितपणे मनाई असेल. विवाहासंबंधी कार्यक्रमात एकत्र जमणे-पाहुण्‍यांची कमाल संख्‍या 50 पेक्षा अधिक असणार नाही. अंत्‍यसंस्‍कार / अंत्‍यविधी यासंबंधीतील कार्यक्रमात एकत्र जमणे- व्‍यक्‍तींची संख्‍या 20 पेक्षा अधिक असणार नाही.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे, संबंधित स्‍थानिक प्राधिकरणांव्‍दारे, त्‍यांचे कायदे, नियम,विनियम यांनुसार विहित करण्‍यात येईल अशा दंडाच्‍या शिक्षेस पात्र असेल.  सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू, इत्‍यादींच्‍या सेवनास मनाई आहे.

        कामाच्‍या ठिकाणांबाबतचे अतिरिक्‍त निदेशः कामाच्‍या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्‍त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.  घरातून काम करणे –शक्‍य असेल तेथवर, घरुन काम करण्‍याची पध्‍दत अनुसरण्‍यात यावी. कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना यांमध्‍ये कामाच्‍या / कामकाजाच्‍या वेळांचे सुनियोजितपणे आखणी करावी.  परिक्षण (स्‍क्रीनिंग) व स्‍वास्‍थ्‍य- औष्णिक परीक्षण (थर्मल स्‍कॅनिंग), हात स्‍वच्‍छ करण्‍याचे द्रव्‍य (हँडवॉश) व निर्जंतुकीकरण द्रव्‍य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशव्‍दाराजवळ व निर्गमन व्‍दाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्‍यात येईल.  वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) – संपूर्ण कामाच्‍या ठिकाणाचे, सामाईक सुविधांचे व मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे, उदाहरणार्थ दरवाजांच्‍या मुठी (डोअर हॅण्‍डल) इत्‍यांदींचे कामाच्‍या पाळ्यांमध्‍ये वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्‍याची सुनिश्चिती करण्‍यात येईल.

            सामाजिक अंतर राखणे- कामाच्‍या ठिकाणांच्‍या सर्व प्रभारी व्‍यक्‍ती, कामगारांमध्‍ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्‍या पाळ्यांदरम्‍यान पर्याप्‍त अंतर ठेवणे, दुपारच्‍या जेवणाच्‍या वेळेत पुरेसे अंतर राखणे, इत्‍यांदींव्‍दारे सामाजिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील.

             कोणतीही व्‍यक्‍ती/ संस्‍था/ संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment