२ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात २ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर गेली. बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यातील कोठड्यांमधील २२ कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

२२ कैदी, शहरातील घोडेकरमळा येथे ४, एकतानगर, कुरणरोड, पावबकी रोड (प्रत्येकी ३), रंगारगल्ली, माळीवाडा, विजयनगर, पद्मानगर, साईबन कॉलनी (प्रत्येकी २), कुंभारगल्ली, जेधे कॉलनी, साईनाथ चौक, खंडोबागल्ली,

तहसील कचेरी, इस्लामपुरा, महात्मा फुलेनगर, सुतारगल्ली, इंदिरानगर (प्रत्येकी १), तर रायतेवाडी ८, निमोण ६, पेमगिरी (५, यात एक २ वर्षांचा बालक), शेडगाव, निमगावपागा ४, सावरगावतळ,

आश्वी बुद्रूक (३), घुलेवाडी, खराडी, जोर्वे (२), कुरण, ढोलेवाडी, घारगाव, राजापूर, नांदूर खंदरमाळ, निमज, खांडगाव, वरुडी पठार, समनापूर, दाढ खुर्द,

रायते (प्रत्येकी १) अशा १०८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सावरगावतळ, निमगावपागा, जोर्वे, घुलेवाडी आदी गावांसह

अनेक ग्रामपंचायतींनी बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून ५ दिवस गाव लॉकडाऊन केले आहे. बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी असून विलगीकरण कक्षात थांबणे बंधनकारक केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com 

Leave a Comment