‘भाजप नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करावे’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे.

भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे.

भाजपने याविरोधात आंदोलन करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले. काल (शुक्रवार) अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा घेतला.

त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘एखादा विषय मार्गी लावण्याच्या स्तरावर असेल तेव्हा भाजप आंदोलन करत असते.

ही भाजपची सवय आहे. भाजपचे जे नेते महाराष्ट्रात आंदोलन करतात ते केंद्र सरकार दहा ते पंधरा हजार टन दूध पावडर आणत आहे, त्याबद्दल केव्हा आंदोलन करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा तुम्ही शांत बसता, सन २०१६ मध्ये जीएसटीचे केंद्र सरकारच्या निर्णयाने १६ हजार कोटींचे नुकसान झाले,

त्याबद्दलही भाजप बोलत नाही, असे सांगतानाच सोयीचे राजकारण भाजपाचे नेत्यांकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment