ह्या ठिकाणी ठेवणार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित कैदी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये दुय्यम कारागृहातील कैद्यांचा देखील समावेश असून बाधित कैद्यांची संख्या वाढत आहे.

त्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे.

जिल्यातील श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर येथील कैद्यांना कोरोना झाला आहे. तब्बल ६०च्यापेक्षा अधिक कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

त्यामुळे अशा बाधित कैद्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहेत. विसापूर कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

येथील कैद्यांना लागण झाल्यास त्यांची व्यवस्था कार्यकारी अभियंता. कुकडी पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहात करण्यात येणार आहे.

क्वारंटाईन केलेल्या कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. तर आरोग्य सोयी-सुविधांची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाकडे देण्यात आली आहे. जेवण, नाश्ता, चहा आदी सुविधेसह तेथील सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment