मुदतीपूर्वीच पीकविमा भरणा साईट बंद;शेतकरी संतप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- सातत्याने पीक विमा भरुनही आणि नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याने नगर जिल्ह्यात यंदा पीक विमा भरण्याला आत्तापर्यंत फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

त्यातच विमा भरण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळ वाया जात आहे आणि आता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि.31 जुलै 2020 ही अखेरची तारीख असताना

दोन दिवस अगोदर म्हणजे 29 जुलै मध्यरात्रीपासूनच राज्य शासनाने हे संकेतस्थळ बंद केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे यास मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्त पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गेल्या

काही वर्षापासून प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे यंदा ही योजना खरीप हंगामातील पिकासाठी सुरु करण्यात आली असल्याचे जाहीर केले होते.

त्याप्रमाणे ही योजना 31 जुलै 2020 पर्यंत सुरु राहणार असून याचा जास्तीजास्त शेतकरीबांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शासनाने दोन दिवस अगोदर हे संकेतस्थळ बंद केल्याने शेतकर्‍यांनी या बाबत तिव्र संताप व्यक्त केला आहे. पीकविमा योजने पासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी,

अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. या बाबत प्रयत्न सुरु आहेत. संकेतस्थळ सुरु करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली आहे.

शेतकरी पीकविमा योजने पासून वंचित राहू नये, म्हणून मुदतवाढ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे कृषी अधिकारी काशिनाथ आडभाई यांनी सांगितले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment