Live Updates : दूध उत्पादकांचा एल्गार, अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.

 

राज्यात आज दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात व जिल्ह्यातही आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अकोले तालुक्यात माजी आमदार व अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांनीही राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले असून दूध उत्पादक शेतकऱ्यां समवेत ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाएल्गार आंदोलन करण्यात आले. दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान, दूध खरेदीचा दर 30 रुपये प्रति लिटर व दूध भुकटी निर्यातीला प्रति लिटर 50 रुपये अनुदान अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment