आमदार रोहित पवार म्हणाले कोरोनाला न घाबरता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले.

सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजात अनेक लोक पुढे येऊन मदत करत असतात. कोरोनाच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे रुग्णही मोठ्या प्रमाणात निघत आहेत.

घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोना आजारावर आपण सर्वांनी मात करायची इाीक. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे.

या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन समाजामध्ये एक दिशादर्शक काम ठरेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

आयुर्वेद कॉलेज येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आमदार पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप,

माजी नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बॅकेचे संचालक अमित मुथा, कमलेश भंडारी, अर्बनचे संचालक शैलेश मुनोत, धनेश कोठारी, रोशन चोरडिया, राजेंद्र फाळके, अभिजित खोसे, योगेश गलांडे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधिलकीतून काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक यासाठी पुढे येत आहे.

त्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहचत आहे. आयुर्वेद कॉलेजमध्ये ३० बेडचे गुरू आनंद कोविड सेंटर सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी बडी साजन येथे लवकरच १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करणार आहे, असे ते म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment