अकोल्यात आढळले नवे १० बाधित, रुग्ण संंख्या १४८

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले शहरात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यात पोलिसांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

अगस्ती चित्रपट गृहाजवळ तीन, तर एक तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस एक आणि उंचखडक बुद्रूक येथील एक असे दहा रिपोर्ट बाधित आढळले.

अकोले शहरातील एक पोलिस कर्मचारी संगमनेर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. त्यामुळे आपले कार्य बजावत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

ते अकोले ते संगमनेर असे ये-जा करीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची बाधा झाली. यामुळे शनिवारी दिवसभरात शहरात ४ व तालुक्यात १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून

आल्यानंतर शनिवारी तालुक्याची रुग्णांची एकूण संंख्या १३० वर पोहोचली. रविवारी सकाळी तालुक्यात आणखी १२ बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर तालुक्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची एकूण संंख्या १४८ झाली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment