पारनेर तालुक्यात 32 कोरोना बाधीत रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यात मंगळवारी ३२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ.ग्रामीण भागातील छोट्या गावातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे.

पारनेर शहराचीही कोरोना पाठ सोडेना, आज ३ रुग्ण वाढले  चौधरी वस्तीवर दोन तर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागातील महिला कर्मचारी कोरोना बाधीत.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पारनेर शहर कोरोना समितीचा दोन दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय.शहरातील प्रतीथयश रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व परिसरातील औषध विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह.

पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके (वाडेगव्हाण) यांच्या कुटुंबातील सर्व १४ सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्हनिघोजच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या आई व पत्नीस कोरोना.

कीन्हीची आघाडी, ८ रुग्ण आढळले.  ६० वर्षीय दोन, ३६ वर्षीय महिला, ७ वर्षांची मुलगी तसेच ४० वर्षीय दोन तरुण व १२ वर्षाच्या मुलाचा सामावेश.

सुप्यात ६२, ३६, ३२ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी व ३२ वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा.वाडेगव्हानमध्ये ७४, ३६ व ३५ वर्षीय महिला, ४६ वर्षाचा पुरुष कोरोना बाधीत.

रांजणगावमशीद मध्ये ७० वर्षाचे आजोबा तर ६० वर्षांची आजी पॉझिटिव्ह. डिकसळमध्ये १२ व ९ वर्षांची मुलेही कोरोनाच्या विळख्यात.रुईछत्रपती येथे ५७ व २८ वर्षाच्या महिलांना कोरोनाचा संसर्ग

नारायणगव्हाणच्या ३७ वर्षाच्या पुरुषाला व १६ वर्षाच्या मुलास कोरोनादैठणे गुंजाळचे ७० वर्षाचे आजोबा, हंग्याचा २४ वर्षांचा तर वाडझिरे येथील ४५ वर्षांचा तरुण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह.

तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांची माहिती.सरकारी सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरीकांवर तसेच व्यवसायिकांवर कठोर कारवाईचा तहसीलदार ज्योती देवरे यांचा इशारा.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment