नामदार शंकराव गडाख पोहोचले कोविड सेंटरमध्ये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली.

परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व करोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.

नेवासा तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून करोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करून.

त्यांनी शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती नामदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना केले दिली.

नेवासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली.

तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाय योजना करण्याच्या दुष्टीने सूचना केल्या. यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नगरपंचायतचे सतीश पिंपळे,

मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, नेवासा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment