`या` मंगल कार्यालयात 100 बेडचे अद्यावत कोविड सेंटर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आपण प्रत्येक जण समाजाचे देणे लागतो अशा निस्वार्थी भावनेने हे काम सुरु असुन आयुर्वेद कॉलेजनंतर गुरु आनंद कोविड फाउंडेशनने आणखी एक कोविड केअर सेंटर सुरु करून, रुग्णांची मोठी सोय केली आहे.

त्यामुळे करोनाची महामारी लवकरच संपुष्टात येईल, असा विश्‍वास आमदार अरूण जगताप यांनी व्यक्त केला.नगरमधील गुरु आनंद कोविड फाउंडेशनने करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून बडीसाजन मंगल कार्यालयात 100 बेडचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.या सेंटरच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पुढे जगताप म्हणाले, करोना महामारीवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहे.नगर शहरात विविध संघटना, संस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अविरत काम करून कोविड रुग्णांना मदत करत आहेत.

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण प्रत्यक्षात उतरवणारे हे कार्य सध्याच्या काळात लाखमोलाचे ठरत आहे.

यावेळी कमलेश भंडारी म्हणाले, गुरु आनंद फाउंडेशनने आचार्यश्रींच्या शिकवणुकीप्रमाणे मानवसेवा केंद्रस्थानी ठेवून सर्वप्रथम आयुर्वेद महाविद्यालयात आ.अरूण जगताप, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटर सुरु केले.

याठिकाणी आदर्श व्यवस्था उभारल्याने ते राज्यातील रोल मॉडेल ठरत आहे. याचदरम्यान शहरात रूग्णसंख्या वाढत असल्याने आम्ही बडीसाजन मंगल कार्यालयात 100 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे.

यावेळी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, सुमतीलाल कोठारी, कमलेश भंडारी, डॉ.आशिष भंडारी, धनेश कोठारी, शैलेश मुनोत, अमित मुथा, रोशन चोरडिया, चेतन भंडारी, गणेश कांकरिया, तुषार चोरडिया, विशाल झंवर, सुमित लोढा, हेमंत कोटेजा आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment