अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

दरम्यान अनिल  राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत.

जनसामान्यांच्या प्रश्नांकरिता एका फोनवर उपलब्ध असणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. अनिल भैय्यांना एक फोन केला की अडचण दूर होणार,

हे नागरिकांना माहिती असयाचं.आता अनिल भैय्यांच्या जाण्याने यापुढे आता त्यांचा आवाज कधीच ऐकू येणार नाही, अशा भावना शिवसैनिकांनी बोलून दाखवल्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment