संगमनेरात आरती करणं पडलं महागात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आज दुपारी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याची सुरुवात मंगळवारपासूनच करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले.

दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असताना संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी नवीन नगर रस्त्यावरील श्रीराम मंदिर परिसरात एकत्र जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील अभिनव नगर येथील श्रीराम मंदिरात आरती करण्यासाठी एकत्र जमलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या पदाधिका-यांना ताब्यात घेण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे तेथे पोहोचले.

त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिका-यांना ताब्यात घेत सरकारी वाहनात बसवून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याने संगमनेर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment