अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासात वाढले ४७० रुग्ण , चौघांचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे जिल्ह्यात आणखी ४७० रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३०, अँटीजेन चाचणीत २२६ आणि खासगी प्रयोगशाळेतील २१४ रुग्णांचा यात समावेश आहे. 

गेल्या चोवीस तासांत चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८८ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २६१० इतकी झाली आहे. दरम्यान, बुधवारी २१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५८० झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६ बाधित आढळले. बाधित रुग्णांमध्ये श्रीरामपूर २, मनपा ४, कॅन्टोन्मेंट ३, राहुरी २, नगर ग्रामीण २, कर्जत १, श्रीगोंदे १, नेवासे येथील १ रुग्णाचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा १४ बाधित आढळले.

यामध्ये मनपा ६ पाइपलाइन रोड १, गौरी घुमट १, सारसनगर १, नगर १, दिल्लीगेट १, सावेडी १. नगर ग्रामीण १, सारोळे कासार, कॅन्टोन्मेंट १, शेवगाव १, शहर टाकळी, कर्जत २, राशीन २, संगमनेर १, निमोण, श्रीरामपूर २. अँटीजेन चाचणीत २२६ जण बाधित आढळले.

यामध्ये मनपा १७, संगमनेर १२, राहाता १२, पाथर्डी २५, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १०, नेवासे १८, श्रीगोंदे १२, पारनेर १४, राहुरी १, शेवगाव २५, कोपरगाव ३०, जामखेड ३ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या २१४ रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये मनपा १७१, संगमनेर १७, राहाता ६, पाथर्डी ३, नगर ग्रामीण ३, श्रीरामपूर १, नेवासे ४, श्रीगोंदे ३, पारनेर १, अकोले ३ आणि कर्जत येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment