खासदार सुजय विखे म्हणाले प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती.

या पार्श्वभूमीवर आता नॅशनल हेल्थ मिशनद्वारे त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई प्रतीक्षेत आहे. याबबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही.

जनतेने ज्या हेतूने मला निवडून दिले, त्याला न्याय देऊ शकत नसल्याने हतबलता व्यक्त केली. जिल्हााधिकारी हे माझे चांगले मित्र आहेत.

आमच्या चांगला संवाद आहे. माझ्याकडून काही माहिती त्यांनी घेतली परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाने वेळीच अंमलबजावणी केली असती तर निश्चितच नगर जिल्ह्यावर ही वेळ आली नसती.

जिल्हा प्रशासन माझे ऐकत नाही, याबाबत माझ्या मनात जे काही होते ते मी केंद्रीय समितीसमोर मांडलेले आहे. समितीच्या बैठकीत काय झाले हे आम्हाला बाहेर सांगता येत नाही.

परंतु मला जे काही सांगायचे आहे. ते मी लेखी स्वरूपामध्ये सांगितलेले आहे असे सुजय विखे यांनी बोलताना स्पष्ट केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment