पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू ; त्यानंतरही जे घडले तेही धक्कादायक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे एक दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी विहिरीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला.

परंतु या घटनेनंतर विहिरीत जास्त पाणी असल्याने जलतरणपटूंसह अनेकांनी सुमारे सहा तासांचे अथक प्रयत्न करूनही रात्री उशीरापर्यंत करूनही मृतदेह निघाला नाही.

तसेच अग्निशमनचा प्रयत्नही अपुरा पडला. अखेर आज सकाळी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. केशव बाळासाहेब चव्हाण (वय- 23) असे या युवकाचे नाव आहे.

या विहिरीत पोहण्यासाठी सुनील फासाटे, त्यांचा मुलगा गौरव व मयत केशव हे तिघे गेले होते. गौरव आणि केशव हे दोघेही काहीवेळ याच विहिरीत पोहले होते.

त्यावेळी सुनील हे विहिरीजवळच बसून होते. नंतर काहीवेळाने या दोघा मुलांनी विहिरीच्या कठड्यावरून विहिरीत एकापाठोपाठ उड्या मारल्या.

उडी मारल्यानंतर केशव बराच वेेळापर्यंत बाहेर आला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सुनील फासाटे यांनी सांगितले. नंतर सुनील फासाटे यांनी ओरडा करत शेजारच्या शेतकर्‍यांना मदतीसाठी बोलावले.

या युवकाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले परंतु उपयोग झाला नाही. विहीर तुडूंब पाण्याने भरलेली असल्याने अनेकांचे अनेक प्रयत्न विफल होत होते.

कारण या विहिरीची खोली सत्तर फुटाची असून विहिरीत जमिनी बरोबर पाणी असल्याने ते शक्य नव्हे. या केशवचा शोध घेण्यासाठी टाकळीभान येथील जलतरणपटू दाखल झाले परंतु त्यांचेही प्रयत्न असफल झाले.

याच दरम्यान या विहिरीतील पाणी पातळी कमी करण्यासाठी जवळ वीजपुरवठ्याची सोय नसल्याने श्रीरामपूर नगर परिषदेची अग्नीशामक बोलविण्यात आली परंतु अरूंद रस्ता व रस्त्याच्या कडेची वाढलेली

झाडे व आडव्या झाडांच्या फांद्यांमुळेही अग्नीशामकला अर्ध्या रस्त्यातून मागे परतावे लागले. अखेर रात्री उशीरा अंधार वाढल्यानंतर

जवळपास वीज नसल्याने सर्वांनी प्रयत्न थांबविण्याचा निर्णय घेत आज सकाळपासून या युवकाला शोधण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment