मोठी बातमी : निवृत्ती महाराज देशमुखांना न्यायालयाचा मोठा दिलासा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टची तारीख देत

खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदुरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर न्यायालयात येणार असल्याने

त्यांच्या चाहत्यांसह राज्यभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालया बाहेर मोठी गर्दी केली होती, मात्र सत्र न्यायालयाच्या स्थगितीने त्या सर्वांचा हिरमोड झाला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment