राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-देवळाली प्रवरा येथील गणेगाव रोड वस्तीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह त्यांची पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीनंतर आढळून आले.

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे १२ रुग्ण सापडले. त्यातील ११ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

यातील पशू वैद्यकीय क्षेत्रातील एकाचा नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात रुग्ण सापडले नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असताना

देवळाली प्रवरा येथील राजकीय क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या पिता-पुत्रांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. देवळाली प्रवरा नगरपालिकेने रस्ता बंद केला

असून परिसरातील व्यक्तींना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. गुहा येथील ५० वयाच्या पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment