‘साहेब, 15 हजारांत गाय घेऊन दाखवा’; माजी मंत्री कर्डिले यांना आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : पशुपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी, मेढी पालन आदी व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यास जिल्हा सहकारी बँकने चालू हंगामात मंजुरी दिली आहे.

त्यानुसार प्रत्येकी 10 गायींसाठी १५ हजारांप्रमाणे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात दिले जाईल अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

यासंदर्भात शेवगाव तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शेतकर्‍यांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. सध्या दुभत्या जनावरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

जर 15 हजारांमध्ये गायी खरेदी होत असतील तर कर्डिले साहेबांनी स्वतः गायी खरेदी करून द्याव्यात असे आवाहन शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब फटांगरे यांनी केले.

सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांनी प्रत्येक गावातून बँकेच्या या निर्णयाची कोटेकोरपणे अंमलबजावणी करत कमीतकमी 50 शेतकर्‍यांची प्रकरणे जिल्हा बँकेच्या शाखेकडे पाठविण्यात यावे,

असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी तालुका विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने सेवा संस्थेच्या सचिवांच्या बैठकीत केले होते.

परंतु 15 हजारांमध्ये गायी खरेदी होत असतील तर कर्डिले साहेबांनी स्वतः गायी खरेदी करून द्याव्यात. प्रत्येक गावातून शंभरपेक्षा जास्त प्रकरणे जिल्हा बँकेकडे पाठवू, असे आवाहन आप्पासाहेब फटांगरे यांनी केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment