‘ह्या’ धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संततधार सुरुच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

काल दिवसभरात दारणा, भावलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत होत्या. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचे आगमन नगण्य होते.

मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. भावलीला 24 तासांत 118 मिमी पावसाची नोंद झाली.

तर दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 108 मिमी पावसाची नोंद झाली. या तुलनेत गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दारणा धरण काल सकाळी 85.09 टक्क्यांवर तर गंगापूर धरण 53.81 टक्क्यांवर पोहचले होते.

दारणात 24 तासांत 362 दलघफू नविन पाणी दाखल झाले. भावलीत 76 दलघफू पाणी नविन दाखल झाले. भावलीतून 948 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भावली ओव्हरफ्लो झाले आहे.

हे पाणी दारणाच्या दिशेने फ्लो होत आहे. काल सकाळी दारणाच्या भिंतीजवळ 15, घोटीला 47, तर इगतपूरीला 108 मिमी पावसाची नोंद झाली.

7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6083 दलघफू पाणी साठा आहे. या धरणात 1250 क्युसेक ने विसर्ग दोन दिवसांपासुन सुरु झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment