श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाने घेतले ‘इतके’ बळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 384 वर जाऊन पोहोचली आहे.काल मोरगे वस्तीवरील एकाचा उपचारादरम्यान नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची तालुक्यातही संख्या 10 वर पोहोचली आहे.

तर 233 जणांनी कोरोनावर मात केली आहे काल घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांमध्ये गोंधवणी 3, पढेगाव 4, वॉर्ड नं. सात 4, वढणे वस्ती 1,

खंडाळा 1, आशिर्वाद नगर 1, संगमनेर रोड 1, इंदिरानगर 2, नेवासा रोड 2, वॉर्ड नं. तीन 1, वॉर्ड नं. सहा 1, वॉर्ड नं. सात 3 आदी रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2067 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 384 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 926 रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपले उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांनी ६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. प्रशासनाने सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment