शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट; लाभ घ्यायचाय ? मग हे वाचाच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती.

ही घोषणा ७ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वे सेवेचा फायदा अनेक राज्यांमधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या ट्रेनच्या सहाय्याने देशात भाजीपाला, फळे, फुले आणि मासे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत वाहतूक करण्याचे काम केले जाईल.

त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या किसान रेल्वेची सुरूवात महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत होणार आहे.

नाशिकजवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत किसान रेल्वे चालवण्यात येणार आहे.

किसान रेल्वे या दोन स्टेशनमधलं १,५१९ किमीचं अंतर ३२ तासांमध्ये पूर्ण करेल.  देवळाली येथून निघाल्यानंतर ही गाडी नाशिकरोड, मनमाड,

जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर येथे थांबेल.

ही ट्रेन सध्या साप्ताहिक असेल. यात 11 पार्सल डब्बे बसविण्यात आले आहेत. या ट्रेनच्या सहाय्याने देशात भाजीपाला,

फळे, फुले आणि मासे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत वाहतूक करण्याचे काम केले जाईल. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की,

देशातील हा पहिला पायलट प्रकल्प आहे. पंतप्रधानांनी रेल्वेने देशाच्या प्रगतीचे इंजिन व्हावे, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे.

यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील कृषी उत्पादनांची सुरळीत आणि सुलभ वाहतूक होईल. यामुळे देशातील शेतकरी

समुदायास स्वावलंबी होण्यास आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

* शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे उद्दीष्ट :-या रेल्वेमध्ये रेफ्रिजरेटेड डबे असतील. त्याची  17 टनची क्षमता असेल. हे रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथळा येथे बनविण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे हा एक मोबाइल कोल्ड स्टोरेज असेल

ज्यामध्ये शेतकरी नाशवंत भाज्या, फळे, मासे, मांस, दूध सुरक्षित ठेऊ शकतात. कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे.

* शेतकऱ्यांनी इथे संपर्क करावा: – या गाड्यांमध्ये पार्सल बुक करण्यासाठी शेतकरी रेल्वे स्थानकावर संपर्क साधू शकतात. मध्य रेल्वेने पार्सल बुकिंगसाठी काही फोन नंबर दिले आहेत. वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक,

भुसावळ- 7219611950, उप-मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक, फ्रेट सर्व्हिसेस- 8828110963, सहाय्यक वाणिज्यिक व्यवस्थापक, फ्रेट सर्व्हिसेस- 8828110983, मुख्य वाणिज्य निरीक्षक, फ्रेट सर्व्हिसेस- 7972279217 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment