पाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.

पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे.

काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरण 63 टक्के भरले होते.दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे.

घाटघर येथे सकाळी 170 मी.मी. तर रतनवाडी येथे 159 मी.मी., पांजरे 130 मी.मी., भंडारदरा 127 मी.मी पावसाची नोंद झाली. मुळा धरणातील जलसाठ्याने शुक्रवारी दुपारी 3 वाजता 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला.

गेल्या वर्षी या काळात मुळा धरणात 81 टक्के जलसाठा होता. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी 6 वाजता 5352 दलघफु इतका झाला.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे 70 मी.मी पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघुपाटबंधारे तलावावरुन सकाळी 6 वाजता 1012 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात झेपावले. भं

डारदरा परिसरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे. दरम्यान काल सायंकाळनंतर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment