धक्कादायक ! ‘ह्या’ ठिकाणी बिबट्याने केला हल्ला; ‘इतके’ तरुण जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा हल्ला हि गोष्ट नित्याचीच झाली आहे. अनेक लोक दहशतीखाली आहेत. विशेषतः शेतकरी वर्ग जास्त दहशतीखाली आहे.

आता तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळ गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये चौघे तरुण जखमी झाले आहेत.

या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान,आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्यावरील लेंडी नाल्यावरून प्रवीण रामनाथ घोलप व सार्थक गणेश घोलप हे दोघे दूध घालून घरी जात असताना

बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी बिबट्याने त्यांच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोटरसायकलला अडकवलेल्या दुधाच्या किटलीमुळे पायाला पंजाने ओरबडले.

यावेळी घोलप बंधुंनी आरडाओरड करत प्रतिकार केला असता परिसरातील नागरिक धावून आले. त्यामुळे बिबट्याने शेजारील शेतात धूम ठोकली.

नंतर याच ठिकाणी पुन्हा कैलास कारभारी खेमनर व सोमनाथ तुळशीराम खेमनर हे ओझरला रात्री घरी जात असताना बिबट्याने दोघांवर हाल्ला करुन गंभीर जखमी केले.

पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment