सीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात व शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने यंदा सीन नदीला भरपूर पाणी आहे. तसेच धरणही पूर्ण क्षमतेने पाणी आहे.

परंतु काल दुपारी सीनमधे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील रातंजन येथे घडली. सिध्दार्थ विजय काळे (वय १६), तेजस सुनील काळे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत.

सीना नदीतून बेसुमार वाळू उपसा असल्याने याठिकाणी वीस फूटापर्यत खड्डे आहेत. अनेक दिवसांनी सीना नदी वाहती झाल्याने ही मुले पोहण्यासाठी नदीवर गेली होती.

पाण्यात या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात बुडाली. घटनेची माहिती समजताच गावातील तरूणांनी सुमारे अर्धा तास पाण्यात बुड्या घेऊन या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. सदर दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सीन पात्रात बऱ्याच ठिकाणी बेसुमार वाळू उपसा झालेला आहे. त्यामुळे अनेक मोठंमोठे खड्डे पात्रामध्ये पडलेले आहेत. मागील वर्षीही अशीच दुर्घटना घडली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment