अकोले तालुक्यात बाधित रुग्णांचे द्विशतक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांनी शनिवारी डबल सेंचुरी मारली. यामुळे तालुक्यातील विविध गावांतून पॅाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या सबंधित गावतील इतर नागरिक प्रचंड दडपणाखाली येत असल्याचे दिसून येत आहे.

अशातच लाॅकडाऊन उठल्यानंतर बाजारातून व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातून खरेदीसाठी केलेल्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

अकोले तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत चार व्यक्ती बाधित आढळून आल्यानंतर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २०० झाली. दररोजच कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

शुुक्रवारी १९ रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी सकाळी खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये ६४ व्यक्तीच्या घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये तालुक्यातील देवठाण

येथील दोन व म्हाळादेवी येथील दोन अशा चार जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. यामध्ये देवठाण येथील २२ वर्षीय दोन पुरुष व म्हाळादेवी

येथील ३० वर्षीय पुरुष व ३ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बाधित रुग्ण संख्या २०० पूर्ण झाली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment