अहमदनगर मध्ये शिवसैनिकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा ! जाणून घ्या कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस्त महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.

या प्रकरणी नगर शहरात शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ‘शिवसेना स्टाईल ने जाळुन’ निषेध व्यक्त करण्यात आला.

बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप करीत

शिवसेनेने कर्नाटक सरकारचा निषेध केला.कर्नाटक सरकारने छत्रपतींच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगरमध्ये शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर,शहर प्रमुख दिलीप सातपुते,

जि.प,सदस्य संदेश कार्ले,नगर तालुका प्रमुख राजु भगत,संभाजी कदम,नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, रमेश परतानी,नगरसेवक ,पदाधिकारी आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment