आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तीनमहिन्यांची वीज बिले ग्राहक भरणार नाहीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य शासनाने महावितरणला अनुदान स्वरुपात द्यावी, 

अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तीन महिन्यांची वीज बिले ग्राहक भरणार नाहीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी अनिल पवार यांना लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, लाल पटेल, भाऊसाहेब हळनोर, नाना पाटील, अभिषेक खंडागळे, गणेश भाकरे, आदिनाथ झुराळे, प्रकाश नवले, प्रविण फरगडे, विजय मोरगे, प्रमोद करंडे,

अ‍ॅड. सुभाष चौधरी, अ‍ॅड.उमेश लटमाळे, सोपानराव नाईक, दत्तात्रय कांदे, संकेत संचेती, ज्ञानेश्वर नानेकर, विष्णू मोढे, आण्णासाहेब गारडे, पत्रकार सुरेश कांगुणे, संजय मोरगे आदींच्या सहीने निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,

वीज बिल माफीसाठी १३ जुलै रोजी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलामध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले होते.

परंतू ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही तर उलट आजच्या कोरोना स्थितीत त्यांच्या अडचणीवर आणि दु:खावर मीठ चोळणारी आहे. राज्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त वीज ग्राहकांची बिकट परिस्थिती झाली आहे.

त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण वीज बिले माफी करावीत, अशी ग्राहकांची मागणी आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या १०० युनिटच्या आतील वीज ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment