जमिनी गेल्यावर आम्ही काय करायच.आमच्या पोरांनी कुठे जायच.दोन दिवस झाले अन्न गोड लागत नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  याआधी आमची जमीन मुळा धरणात गेली, काही जमीन लष्करी सराव क्षेत्रात (के. के. रेंज) आता परत आमच्या जमिनी घेऊ नका.मोठ्या कष्टानी आम्ही जमिनी बागायती केल्या.आता या जमिनी गेल्यावर आम्ही काय करायच.

आमच्या पोरांनी कुठे जायच.दोन दिवस झाले अन्न गोड लागत नाही.आमच्या चुली पेटल्या नाहीत.आमच्या जमिनी घेऊ नका अशी आर्जव प्रस्तावित लष्करी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज लष्कराच्या अधिकाऱ्यांना केली. लष्कराच्या सराव क्षेत्राच्या हद्दवाढीसाठी तालुक्यातील वनकुटे, ढवळपुरी,

पळशी, गाजदीपूर, वडगाव सावताळ या गावातील जमिनींचे अधिग्रहण होणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. रविवारपासून लष्करी वाहनांचा वावर या गावांमधे वाढला आहे. रविवारी गावकऱ्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना नेमक काय चाललय आम्हाला कळू द्या अशी विचारणा केली मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

त्यामुळे गावकऱ्यांमधे अस्वस्थता पसरली. सोमवारी पुन्हा लष्कराचे अधिकारी गावात आले. गावकऱ्यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना विचारणा केली. आमच्या जमिनी घेऊ नका, अशी आर्जव केली. त्यावेळी, आम्ही या क्षेत्राचे नकाशे तयार करीत आहोत.आम्ही तयार केलेले नकाशे,

अहवाल मुख्यालयाकडे पाठवू. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय व्हायचा तो होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांमधे अस्वस्थता पसरली आहे. लष्कराच्या सराव क्षेत्रासाठी जमिनी हव्या असतील तर राजस्थानातील जमिनी घ्या,

असा सल्ला आमदार नीलेश लंके यांनी दिला आहे. लष्करी सराव क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी आमदार नीलेश लंके व वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीत आमदार लंके बोलत होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment