अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे. 

दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४०८ इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा ४०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २२, श्रीरामपुर ०१,  कँटोन्मेंट १०, नेवासा १३, पारनेर १२, राहुरी ०१, शेवगाव ०१,  कोपरगाव ०५, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पीटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता २४, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०६, श्रीगोंदा १५, पारनेर १०, अकोले ०६, राहुरी १३, शेवगाव ३३,  कोपरगाव १५, जामखेड २२ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३३, संगमनेर ०८, राहाता ०२, नगर ग्रामीण १२, श्रीरामपुर ०३, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा ०२, पारनेर ०२, अकोले ०३, राहुरी ०४, शेवगाव ०२, जामखेड ०७ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२,   श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४,

शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेले एकूण रुग्ण:७७४१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३४०८
  • मृत्यू: ११४
  • एकूण रूग्ण संख्या:११२७३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment