अनिल राठोड यांच्या रुपाने सच्चा मित्राला गमावला; मंत्री गुलाबराव पाटील भावुक, म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे.

स्व. अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी ते भावुक झाले होते.

ते यावेळी म्हणाले, गेल्या अनेक वषार्पासून मी व अनिल राठोड एकत्रपणे आमदार म्हणून काम करत होतो. दोघे एकाच वेळी उपनेते झालो, राठोड यांच्या रुपाने एक सच्चा मित्राला गमावले असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

राठोड यांच्या निधनाने नगरच्या शिवसेनेचेच नाही तर शिवसेना पक्षाचे सुद्धा नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी  त्यांनी राणे पिता-पुत्रांवरही  केली. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे.

त्यामुळे आपण आधी आपली औकात निष्ठा कुठे आहे ती ओळखावी. नंतरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर टीका करावी, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, अनिल भैया राठोड यांच्या निधनाने शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे.

संकटकाळात प्रत्येकाच्या हाकेला ते धावून जात असल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती. राठोड यांच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा होता.

ते सुरुवातीला हिंदुत्वादी संघटनेचे काम करीत होते. त्यांनी १९८७-८८ च्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनतर नगरमध्ये शिवसेनेला वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment