ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- नगर जिह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत.

हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे नगर महापालिका हद्दीत आहेत.

ऑगस्टपर्यंत महापालिका हद्दीत तब्बल ४ हजार ६१६ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३ हजार ३४५ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात ६४७ करोना बाधित वाढले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ व खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत २८५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

मार्च महिन्यापासून ऑगस्टपर्यंत नगर महापालिकेच्या हद्दीमध्ये आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ६१६ एवढी आहे. तर त्या खालोखाल सर्वात जास्त रुग्ण हे संगमनेर तालुक्यात सापडले आहेत.

या तालुक्यात आतापर्यंत १ हजार ८७ करोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८६४ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. सध्या संगमनेर तालुक्यातील २०० रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

याशिवाय राहाता तालुक्यात ५१८, पाथर्डी तालुक्यात ६५०, महापालिका वगळता नगर तालुक्यात ५९३, श्रीरामपूर तालुक्यात ४७४, भिंगार छावणी हद्दीमध्ये ३४१, नेवासा तालुक्यात ३९०, श्रीगोंदा तालुक्यात ४३७, पारनेर तालुक्यात ४३३,

अकोले तालुक्यात २२१, राहुरी तालुक्यात २०२, शेवगाव तालुक्यात ३३३, कोपरगाव तालुक्यात ३७७, जामखेड तालुक्यात १८३, कर्जत तालुक्यात ३५८ करोना बाधित रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.

तसेच नगर जिल्ह्याच्या बाहेरील रहिवासी असलेले मात्र नगर जिल्ह्यात आढळलेल्या ६० बाधितांची नोंदही एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment