‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडियाद्वारे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ या पहिल्याच आभासी ट्रेड शोचे आयोजन करण्यात आले होते.

या तीन दिवसीय ट्रेड शोला २.५ लाख पेज व्हिजिट्स तसेच ५५,००० व्हिजिटर्सचा उदंड प्रतिसाद मिळाला. ट्रेड इंडियाने लघु ओआणि मध्यम उद्योगांच्या चिंतेमुळे अशा प्रकारचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे.

या आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे त्यांनी व्यवसायात पुन्हा रस निर्माण केला. यात ७० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग घेतला असून सध्याच्या आरोग्य संकटातही त्यांचे कामकाज पुन्हा सुरु करण्यास उत्साह दर्शवला.

तीन दिवसांमध्ये ट्रेड इंडियाने जगभरातील ब्रँड्ससाठी माध्यमाचे काम केले. यात त्यांना व्यवसाय संधी, इंडस्ट्रीमध्ये कंपन्यांच्या उत्पादनांचा शोधण घेणे, संभाव्य खरेदीदारासी ऑनलाइन संवाद साधणे यांचा समावेश होता.

साथीच्या काळात फिजिकल इव्हेंट्ससाठी व्हर्चुअल शो हे व्यवहारिक पर्याय असतात, हा विश्वास यातून दृढ झाला. फिजिकल ट्रेड शोमध्ये व्यवसायाच्या विस्तारासाठी कंपन्यांकडून गुंतवणूक केली जाते. तथापि, सोशल डिस्टन्सिंग आणि कोव्हिड-१९ प्रसाराच्या काळात, ट्रेड शोच्या व्याख्येत बदल झाला.

ट्रेड इंडियाचे सीओओ संदीप छेत्री म्हणाले, “मागील तीन दिवसात आम्ही उच्च पातळीवरील एंगेजमेंट अनुभवली. एमएसएमई क्षेत्राच्या संधी वाढवण्यासाठीच्या भावनांचे हे द्योतक आहे. ५५,००० व्हिजिटर्ससह या कार्यक्रमाच्या यशाने व्हर्चुअल कार्यक्रमांची स्वाकारार्हता,

या माध्यमाचा आर्थिक पैलूही दृष्टीक्षेपात आणला आहे. प्रदर्शकांना नवा व्यवसाय आणि ग्राहकांची संधी मिळाली. नवे व्हर्चुअल टूल्स स्वीकारणे, प्रदान केलेल्या जागेचे भांडवल करणे आणि सध्याच्या कसोटीच्या काळात घरात सुरक्षित राहणे आदी गोष्टी प्रदर्शकांना याद्वारे करता आल्या.

पहिल्या प्रदर्शनाच्या यशानंतर आम्ही आणखी एक व्हर्चुअल प्रदर्शन लाँच केले आहे. सप्टेंबर महिन्यातील तिस-या आठवड्यात ‘पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२०’ पार पडेल.”

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment