`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आणि भाजपतर्फे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत.

मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नसून मधल्या दलालांचा फायदा होत आहे. या दलालांशी सरकारमधील काही मंत्र्यांचे संबंध असून ते मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

‘आपली आर्थिक भागिदारी असलेल्या दूध पावडर कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत,’असा आरोप दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्वत: हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे. यासंबंधी डॉ. नवले यांनी सांगितले की, दूध प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे हे द्योतक आहे.

राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या काही घटकांचे हितसंबंध दूध व्यवसायात व शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या लुटीत सामावलेले असल्याने त्यांच्याकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच या प्रश्नांत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत,’ असंही नवले म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment