अबब! ‘ह्या’ तालुक्याची चिंता वाढली; एकाच दिवसात नव्याने २७ रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. शेवगावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

गुरुवारी दिवसभरात तालुक्यात २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या ३४७ वर जाऊन पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात शेवगाव शहरासह तालुक्यातील 198 जणांच्या अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.

यामध्ये 26 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर एका जणाचा नगर येथील खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शेवगाव शहरातील सम्राट अशोकनगर

येथे 2, शास्त्रीनगर येथे 1, विद्यानगर 2, मिरीरोड कोर्टाजवळ 1, खंडोबानगर 1, कोरडेवस्ती 2, माऊलीनगर 1, नेहरूनगर 1, जुना प्रेस 1, काझीगल्ली 1, ज्ञानेश्वरनगर 1 अशा 14 रुग्णांचा समावेश आहे.

तर तालुक्यातील घोटण येथे 2 (1 खाजगी लॅब तपासणी), दहिगावने 3, रांजणी 2, चापडगाव 3, कोळगाव 2 तर ढोरजळगाव येथे 1 अशा १३ रुग्णांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment