मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.

स्वातंत्रदिनाचा मुहुर्त साधत भारताचा कॅप्टन कुल आणि वन डे व २०-२० तील फिनिशअर महेंद्रसिंग धोनी याने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांमधून निवृत्तीची घोषणा करीत जगाला बुचकाळ्यात टाकले.

त्याने निवृत्तीची पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या पाऊण तासात त्या ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ या पोस्टवर पडल्या २३ लाख ७३ हजार ३७५ लोकांनी पाहिली आणि तब्बल दीड लाख कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला.

सगळ्यांनीच त्याच्या रिटायर्टमेंटवर हळहळ व्यक्त केली. धोनी हा भारतीय क्रिकेटता आत्मा समजला जात होता. तो संघात आणि मैदानवर असणेच भारतीय संघासाठी सगळे काही होते.

भारतीय संघाला विश्वविजेतापणाचा मुकुट दुसऱ्यांचा त्यानेच मिळवून दिला. कुल कॅप्टन आणि फिनिशर अशी ख्याती असणाऱ्या धोनीने भारतीयांसह जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वेड लावले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment