खा. सुजय विखेंनी घेतली इंदूरीकर महाराजांची भेट; अन ‘ती’ गोष्ट ठरली चर्चेचा विषय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या भाजप नेत्यांकडून भेटीगाठी सुरूच आहेत. आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदोरीकरांची भेट घेतली.

विखेंनी इंदोरीकरांना ‘जय श्रीराम’ घोषणा छापलेली शाल भेट दिली, तर इंदोरीकरांनी विखेंचे फेटा बांधून स्वागत केले. त्यामुळे फेटा आणि ही शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती.

असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती. खा. सुजय विखे पाटील यांनी अचानक देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली.

या भेटीची कोणालाही माहीती नव्हती. खा. विखे यांनी देशमुख यांच्यासह त्यांच्या परिवाराशी संवाद साधत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

यापूर्वी आ. विखे पाटील यांनी भेट घेतल्यानंतर पुन्हा खा. डॉ. विखे यांनी महाराजांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते.

त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment