भंडारदरा भरले; मोडला ‘हा’ इतिहास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-   सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या

भंडारदरा धरणात आज सकाळी (१६ आॅगस्ट) ६ वाजता १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता. यामुळे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याची पाटबंधारे असल्याचे कार्यकारी उपअभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केले.

या धरणाची ११०२६ दशलक्ष घनफूट क्षमता असून धरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला भरत असते, असा इतिहास आहे. परंतु यंदा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस उशीरा आल्याने धरण एक दिवस उशीरा म्हणजे १६ आॅगस्ट रोजी भरले.

हा इतिहास आज मोडीत निघाला. भंडारदरा धरणावरील वाकी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर निळवंडे धरण ७३.६१ टक्के भरले आहे. भंडारदरा परिसरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.

परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे. १५ ऑगस्ट म्हणजे भंडारदरा परिसरात येणाऱ्यांची मांदियाळी असते. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे याठिकाणी वातावरण पर्यटकांविना सुने सुने आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment