तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-आजच्या काळात बहुतेक लोकांचे  एकापेक्षा जास्त बँक खाते असणे सामान्य बाब आहे. काही लोकांसाठी ही देखील एक गरज आहे परंतु बऱ्याचदा अनेक लोक  आवश्यकता नसतानाही एकापेक्षा जास्त बँक खाते उघडतात. बऱ्याचदा आपण सॅलरी अकाउंट उघडतो.

त्याला न्यूनतम बॅलन्सची आवश्यकता नसते. परंतु बऱ्याचदा पेमेंट जमा नाही झाले तर ते बचत खात्यात रूपांतरित होते. आणि अशा खात्यात न्यूनतम बॅलन्स ठेवला नाही तर बँक तुमच्याकडून भरभक्कम शुल्क देखील वसूल करुन घेऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही एखादे बँक खाते बंद करता तर त्यासंबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला डी-लिंक करावी लागतील. कारण बँक खात्याशी गुंतवणूक, कर्ज, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि वीम्याशी संबंधित पेमेंट जोडलेले असतात.

* एका पेक्षा जास्त बँक खाती असल्यास काय होईल तोटा?:- -ते खाते बचत खात्यामध्ये बदलल्यानंतर त्याचे नियम देखील बदलतात. अशावेळी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स असणे देखील गरजेचे होऊन जाते. अन्यथा बँकेकडून दंड वसुलला जाऊ शकतो.

-जास्त बँक खाती असल्यास आयकर भरताना देखील तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

-त्याचप्रमाणे सर्व बँकांचे स्टेटमेंट ठेवणे अतिरिक्त काम होऊ शकते. निष्क्रिय खात्याचा ठीक वापर न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

-समजा तुमच्याकडे 4 बँक खाती आहेत ज्यामध्ये मिनिमम बॅलेन्स 10000 रुपये आवश्यक आहे. तुम्हाला 4 टक्के व्याजदराच्या हिशोबाने यावर 1600 रुपये व्याज मिळेल.

जर तुम्ही ही खाती बंद करून हेच पैसे म्युच्यूअल फंड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवल्यास जवळपास 10 टक्के अधिक फायदा तुम्हाला मिळेल.

अनावश्यक खाते बंद कसे करावेत – 

१) डिलिंकिंग – बँक 

अकाउंट बंद करण्याआधी त्याला डिलिंक करावे लागेल. जर तुम्ही खात्याचा वापर गुंतवणूक, लोनचा हफ्ता, ट्रेडिंग करणे आणि क्रेडिट कार्ड पेमेंट करणे यासाठी करत असाल तर तुम्हाला खाते डिलिंक करावे लागेल. त्यानंतर या गुंतवणूक व पेमेंट्ससाठी दुसरा खाते क्रमांक नोंदवावा लागेल. खाते बंद करताना तुम्हाला डिलिंकिंग फॉर्म भरावा लागेल.

२) नवीन खात्याचा तपशील द्या

जर आपण जुने वेतन खाते बंद करणार असाल तर अगोदर  पेमेंट करणाऱ्यास तुमच्या नव्या अकाऊंटची माहिती द्या  जेणेकरून आपले वेतन किंवा पेन्शन नवीन खात्यात  येत राहील.

३)  खाते बंद करण्याची फी  जाणून घ्या 

जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आतच बंद करत असाल तर तुमच्याकडून क्लोजर चार्ज वसूल केला जाणार नाही. जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 1 वर्षांच्या आत बंद करत असाल तर तुमच्याकडून क्लोजर चार्जेस घेतले जातील. सर्वसाधारण 1 वर्षानंतर हे चार्जेस घेतले जात नाहीत.

 ४) खात्यात पैसे असल्यास काय करावे?

आपल्याकडे आपल्या खात्यात पैसे असल्यास ते आधी काढून घ्या. आपल्याकडे हे पैसे आपल्या इतर बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील आहे.

हे लक्षात ठेवा की आपल्याकडे आपल्या खात्यात अधिक पैसे असल्यास, खाते  बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ते पैसे  दुसर्‍या खात्यात हस्तांतरित करा.  अकाउंट बंद केल्यानंतरच अंतिम स्टेटमेंट काढून ठेवा कि ज्यात अकाउंट क्लोज चे स्टेटमेंट असेल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment