यंदा अहमदनगर जिल्ह्यात ‘असा’ होणार गणेशोत्सव !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूच्या साथसाखळीमुळे अहमदनगर शहरातील यावर्षीचा गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा होणार आहे.

शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंडळ ट्रस्ट अध्यक्षासह शहरातील मानाच्या गणेश मंडळ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय आज झाला.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या उपस्थित ही बैठक झाली. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेत

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहरातील गणेश मंडळांना यावर्षी गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते.

शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी त्याला प्रतिसाद दिला. शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली.

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्याचा ठराव करण्यात आला. रस्त्यावर मंडप न घालता गणेशमूर्तीची सुरक्षित ठिकाणी स्थापना करून मिरवणूक

आणि देखावे सादर न करता सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे यावेळी निर्णय झाला. भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन व्हावे यासाठी सामाज माध्यमांद्वारे दर्शनाची सोय करण्याचेही या बैठकीत ठरले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment