‘इतका’ झाला मुळा धरणाचा पाणीसाठा वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-रविवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १८ हजार १८१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७० टक्के भरले. सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात १४ हजार ३२१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

४ दिवसात कोतूळकडून मुळा धरणात ३ हजार दशलक्ष घनफुट नवीन पाणी दाखल झाले. शनिवारी सकाळ ते रविवार सकाळ या २४ तासात धरणात ९३६ दशलक्ष घनफुट नवीन पाणी दाखल झाले होते.

गेल्या चार दिवसापासून कोतूळकडून मुळा धरणात समाधानकारक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे.

रविवारी सकाळी ६ वाजता कोतुळ कडुन मुळा धरणात १० हजार २६ क्युसेकने,दुपारी १२ वाजता ९ हजार १५५ क्युसेकने, तर सायंकाळी ६ वाजता

१४ हजार ३२१ क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता कोतुळ कडुन मुळा धरणात अवघी १ हजार ८७४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment