मतिमंद मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एका मतिमंद मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्राह्मणवाडा गावच्या हद्दीत मुळ वेहरे परिसरातील मतिमंद मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या

घरात आरोपी पप्पू रंगनाथ फलके (रा. ब्राह्मणवाडा, मूळ वेहरे) याने फिर्यादीची 32 वर्षीय मतिमंद मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिचेवर तिला धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले.

या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पप्पू रंगनाथ फलके याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment