…तर पाणीप्रश्न कायमचा सोडवता येणे शक्य आहे – खासदार सदाशिव लोखंडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन समुद्रात वाहून जाणारे १६५ टीएमसी पाणी अडवल्यास नाशिक, नगरसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवता येणे शक्य आहे.

यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक घेण्याबाबत आपले प्रयत्न आहेत,

असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भंडारदरा धरणाचे जलपूजन करताना सांगितले. खासदार लोखंडे यांच्या हस्ते व शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत साडीचोळी,

श्रीफळ अर्पण करून विधिवत जलपूजन करण्यात आले. शाखाधिकारी अभिजित देशमुख, सतीश भांगरे, संदीप डगळे, वसंत भालेराव,

उपसरपंच दत्तात्रय भांगरे, सोपान अवसरकर, गोगा भांगरे, सुरेश घाटकर, अनिल अवसरकर, राहुल मोहोड, बबलू गुडेप, हेमंत अवसरकर यावेळी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment