अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला. 

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.१६ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (बुधवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४३, संगमनेर ०३, नगर ग्रामीण ०४, कॅन्टोन्मेंट ०३, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५०६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा १९१, संगमनेर ३६,

राहाता २८, पाथर्डी २०, नगर ग्रा.४०, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा २४, श्रीगोंदा १८, पारनेर २५, अकोले २०, राहुरी ०७, शेवगाव २८, कोपरगाव ०७,जामखेड २४, कर्जत ०५, आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १२१५३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: २६३०
  • मृत्यू: १९१
  • एकूण रूग्ण संख्या:१४९७४

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment