सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रिक्षा चालवून पहा; खा. सुजय विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा आहे. त्यांचा कारभारही तसाच असून हे जास्त काळ टिकणार नाहीत अशी भाजपकडून भाजपकडून टीका होतं आहे. यावरून नगरचे भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तिरकस शब्दांत टीका केली.

खासदार सुजय विखे-पाटील यांनी आज तीनचाकी रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला. रिक्षा चालवल्यानंतर आलेला अनुभव सांगताना त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेतला. माझी खात्री झाली आहे की हे सरकार जनतेसाठी काहीच करू शकत नाही.

करोनाशी लढण्यात, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारकडून अपेक्षा करणेही व्यर्थ आहे,’ असं ते म्हणाले. श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमासाठी सुजय विखे आले होते. त्यावेळी सॅनिटायझरच्या एका उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी एका कार्यकर्त्याची रिक्षा चालविली.

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी रिक्षा चालवण्याचा अनुभव सांगितला. ‘तीन चाकांची रिक्षा चालवणं खरंच अवघड काम आहे. पाच मिनिटेच मी रिक्षा चालवली. पण गाडी तीन चाकी असल्यानं अनेकदा वेग कमी करावा लागला. मागे बसलेले लोकही घाबरत होते.

पाच मिनिटं ती चाकांची गाडी चालवताना एवढी काळजी घ्यावी लागते, तर पाच वर्षे सरकार कसं चालणार हा मोठा प्रश्नच आहे. हे तीनचाकी सरकार किती दिवस चालेल माहीत नाही. त्यात असलेले लोक किती घाबरलेले आहेत हेही माहीत नाही,’ असा टोला सुजय यांनी हाणला.

‘रिक्षाप्रमाणेच तीन पक्षांचे सरकार चालविणेही अवघडच आहे. त्यामुळंच लोकांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ज्यांना कुणाला हे सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रिक्षा चालवून पाहावी. स्वत: अनुभव घ्यावा.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment